देवगडात करीअर महोत्सव !

Edited by: नागेश दुखंडे
Published on: June 05, 2024 12:29 PM
views 177  views

देवगड : विद्या विकास मंडळ संचलित कार्यसम्राट आमदार स्व. आप्पासाहेब गोगटे यांच्या जन्मशताब्दी सोहळ्यातील एक पुष्प म्हणून देवगड मद्ये पहल्यांदा करीअर महोत्सव -२४ चे आयोजन डॉ. भाई बांदकर यांच्या  संकल्पनेतून व सागर इव्हेंटस्शनिवार,यांच्या वतीने  दि.०८ जून २०२४, सकाळी ९ वा. मोरेश्वर गोगटे सभागृह, सांस्कृतिक भवन, जामसंडे, देवगड, येथे शनिवार, दिनांक 8 जून 2024 रोजी सकाळी 9 वा. सुरु(9 ते 12 मार्गदर्शन व 12 ते 4 प्रत्यक्ष काॅन्सिलिंग व ॲडमिशन)देवगड-निपाणी रोड, जामसंडे, देवगड,416612 येथे आयोजित करण्यात आले आहे.

मुख्य मार्गदर्शन म्हणून व करीअर मार्गदर्शन डाॅ.भाई बांदकर करणार आहेत. ॲकेडमिक एज्युकेशन  मार्गदर्शक : श्री. गुरुदेव परुळेकर,  यशवंत भोसले इंजिनिअरिंग काॅलेज-  सावंतवाडी मार्गदर्शक : मिलिंद देसाई, NIBR काॅलेज ऑफ हाॅटेल मॅनेजमेंट  - पुणे

मार्गदर्शक : श्री. वैभव फंड, फ्लोरेट काॅलेज ऑफ इंटिरीअर डिझायनिंग ॲन्ड *फॅशन* डिझायनिंग - कणकवली मार्गदर्शक : मृणाली सावरकर,  किशोर कदम, मुकुंदराव फाटक नर्सिंग काॅलेज - देवगड  मार्गदर्शक : श्री.महेश खोत, विद्या विकास मंडळ : ज्युनियर कॉलेज - जामसंडे मार्गदर्शक : संजय गोगटे, आयटीआय  - जामसंडे, मार्गदर्शक : ठाकरे सर, धनश्री कन्सल्टंसी - इंशुरन्स सेक्टर मार्गदर्शक : सौ.प्रिती देवधर, फोटोग्राफी डिव्हिजन  मार्गदर्शक : वैभव केळकर, पत्रकारीता एक करीअर मार्गदर्शक : श्री.दयानंद मांगले, इव्हेंट मॅनेजमेंट मार्गदर्शक : श्री.सागर बांदकर, आधुनिक शेतकरी एक महत्त्वपूर्ण करीअर, मार्गदर्शक :  विजय शेट्येआदी मार्गदर्शक या करिअर महोत्सवाला लाभणार आहेत. तसेच ३५% पासून ते ९५% पर्यंतचे पर्याय यावर्षी किंवा मागील वर्षातील १०वी/१२वी कमी/जास्त टक्के किंवा नापास सर्वांसाठी मार्गदर्शन आणि अॅडमिशन एकाच ठिकाणी प्रत्येक विद्यार्थी व पालकांस प्रवेश व भोजन मोफत असणार आहे.

दहावी बारावीचे नुकतेच रिझल्ट लागले असल्यामुळे त्यात नेहमीप्रमाणेच कोकण विभाग अव्वल स्थानावर आहे.आणि नापासांची संख्या अगदीच नगण्य पण कुणी हे पहातं का ? की या पास झालेल्या विद्यार्थीसंख्येत किती टक्क्यावाल्यांची संख्या अधिक आहे? या पास झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये 35% ते 55% मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक आहे. मग या विद्यार्थ्यांना करीअरचे मार्ग कोणते ? आणि याचेच मार्गदर्शन नसल्यामुळेच ही मंडळी पुढील काॅलेजीय शिक्षणासाठी आर्टस् साईडला प्रवेश घेतात किवा शहरात जावून वर्कर किंवा हेल्परची नोकरी करतात. त्यांच्यासाठीही करीअरची विविध दालने असतात याची माहीती करुन देण्यासाठीच हा करीअर महोत्सव डाॅ.भाई बांदकर यांच्या संकल्पनेतून देवगडमध्ये पहिल्यांदाच असा भव्य मार्गदर्शन ते ॲडमिशन असा करीअर महोत्सव होत आहे.

विद्या विकास मंडळ संचलित कार्यसम्राट आमदार स्व.आप्पासाहेब गोगटे जन्मशताब्दी सोहळ्यातील एक पुष्प म्हणून ॲड. अजित गोगटे आणि परिवारातर्फे हा करीअर महोत्सव.यामध्ये देवगड, कणकवली, मालवण तालुक्यातील विद्यार्थी पालकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.

या करीअर महोत्सवात काॅलेजीय शिक्षण यावर मार्गदर्शन व ॲडमिशन होणार आहेच पण हाॅटेल मॅनेजमेंट, टुरिझम, फॅशन डिझायनिंग, इंटिरीअर डिझायनिंग, काॅम्प्युटर यांचाही सहभाग असणार आहे. आयटीआय, कृषी विद्यालय हे ही सहभागी आहेत त्याचबरोबर किसान मोर्चातर्फे "शेती एक व्यवसाय" या करीअरवरही भर दिला जाणार आहे. स्पोर्ट्स, फोटोग्राफी,शिवणकला अशा महत्वाच्या विषयावरील करीअर सांगितली जाणार आहेत. सर्व कोर्स व करिअरसाठी एज्युकेशन लोनसाठी बॅंक मार्गदर्शन आहेच तसेच योग्य त्यांना प्रायव्हेट स्कॉलरशिप ही मदत दिली जाणार आहे.मुख्य म्हणजे "सायमलटेनिस एज्युकेशन" यावर विशेष मार्गदर्शन केले जाणार आहे. याचे विविध स्टाॅल कार्यक्रमस्थळी असणार आहेत.

हा कार्यक्रम सकाळपासून संध्याकाळपर्यंत असल्यामुळे येणाऱ्या सर्व विद्यार्थी व पालकांना दुपारच्या भोजनाची विनामुल्य व्यवस्था केली आहे, सर्वानाच प्रवेश मोफत आहे. या कार्यक्रमाचे आयोजन सागर इव्हेंटस् - सागर बांदकर हे करीत असून संजय गोगटे व गुरुदेव परुळेकर  याचे विशेष सहकार्य असणार आहे. या कार्यक्रमाचे मुख्य सूत्रधार ॲड.अजित गोगटे व मुख्य संचालक डाॅ.भाई बांदकर हे आहेत.अधिक माहितीसाठी 8080620715 वर संपर्क साधावा या मार्ग दर्शन शिबिराचा जास्तीत जास्त लाभ विद्यार्थ्यानी घ्यावा असे आवाहन मार्गदर्शक डाॅ.भाई बांदकर  यांनी यावेळी केले आहे.