कणकवलीत अवैध गोवा दारूसह कार पोलिसांच्या ताब्यात !

Edited by: उमेश बुचडे
Published on: April 25, 2024 05:27 AM
views 454  views

कणकवली : कणकवली शहरात अवैध गोवा बनवण्याच्या दारू वाहतुकीवर कणकवली पोलिसांनी कारवाई केली आहे. यामध्ये 6 लाख 24 हजाराचा मुद्देमाल जप्त केला असून एक इनोव्हा कारचा देखील समावेश आहे.

कणकवली तालुक्यात अवैध धंदे जोरात सुरू असल्याची बातमी कोकणसाद लाईव्हच्या माध्यमातून बुधवारी सकाळी प्रसारित करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांना मिळालेल्या गोपिनीय माहितीनुसार कलमठ-नाडकर्णीनगर येथे जाणारी पांढर्‍या रंगाची कार थांबवली असता त्या कारमध्ये 24 हजार रुपायांची गोवा बनावटी दारुच्या 48 सिलबंद बाटल्या जप्त करण्यात आल्या. 6 लाखाच्या इनोवा कारसह पोलिसांनी 6 लाख 24 हजारचा मुद्देमाल जप्त केला. 

कणकवलीचे पोलिस निरीक्षक समशेर तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सागर शिंदे, पोलिस नाईक रुपेश गुरव, श्री. राऊत यांनी बुधवार दुपारी 3.20 वा. च्या सुमारास ही कारवाई केली. याप्रकरणी कारचालक मनोज रामचंद्र जाधव (45, रा. कलमठ-नाडकर्णीनगर) यांच्यावर गैरकायदा विनापरवाना दारु ताब्यात बाळगल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबतची फिर्याद हवालदार मिलिंद देसाई यांनी दिली.