दोडामार्ग : आंबेली येथे पर्यटकांच्या कारला अपघात झाल्याची घटना मंगळवारी रात्री ८:३० वा.च्या सुमारास घडली. यात महिला जखमी झाली असून तिला येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. कारचे देखील मोठे नुकसान झाले आहे.
पुणे येथील एक दाम्पत्य गोव्याला जाण्यासाठी दोडामार्ग मार्गे जात होते. दरम्यान त्यांची कार दोडामार्ग-विजघर राज्य मार्गावरील आंबेली कोनाळकरवाडी येथे आली असता चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले. परिणामी कार थेट घळणीत जात अपघात झाला.