
सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आणि पंचायत समिती साठी आज अखेरच्या दिवशी उमेदवारांची उमेदवारी अर्ज भरण्यासाठी झुंबड उडाली. कोणत्याच पक्षाने अखेरच्या क्षणापर्यंत आपल्या उमेदवारांची यादी जाहीर न केल्यामुळे सर्वच इच्छुक उमेदवारांमध्ये संभ्रमाची अवस्था होती.
उमेदवारी यादी जाहीर केल्यानंतर बंडखोरी होईल अशी भीती भाजप, शिंदे शिवसेना या प्रमुख पक्षांसह सर्वच पक्षांना होती. मात्र तरीही बंडखोरीने आपलं तोंड उघडलेलं आजच्या अखेरच्या दिवशी दिसलं. दरम्यान भारतीय जनता पक्ष आणि शिंदे शिवसेना यांच्यामध्ये युती झाली असली तरी सावंतवाडी मतदारसंघांमध्ये मात्र या युतीला सुरूगं लागल्याचे दिसून आले आहे. जिल्हा परिषदेच्या 50 जागासाठी एकूण 273 तर पंचायत समित्याच्या 100 जागांसाठी 440 उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले आहेत.











