
सावंतवाडी : माजी जिल्हा परिषद सदस्य व नुकतेच उबाठा शिवसेनेतून भाजपात गेलेले मायकल डिसोझा यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. भाजपकडून या ठिकाणी महेश सारंग यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
श्री. डिसोझा यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला असून त्यांनी नुकताच भाजपात प्रवेश केला होता. मात्र, भाजपकडून श्री. सारंग यांना उमेदवारी जाहीर झाल्यान त्यांनी आपल्या समर्थकांसह अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी मेघश्याम काजरेकर, देवेंद्र टेमकर,शिवदत्त घोगळे, निशिकांत पडते, शैलेश तिळवे,संदीप माळकर थॉमस डिसोजा संदीप गवस, मारिया डिमेलो, भरत सावंत, गौरव कुडाळकर, मनोहर ठिकार, तुकाराम कासार, महादेव राऊळ, राहुल राणे, हनु परब, बाळा कारिवडेकर, उमेश भालेकर, ओंकार पडते,समीर धुरी, श्रीहरी धुरी आदि उपस्थित होते.










