
कुडाळ : उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे युवासेना तालुका सचिव केतन शिरोडकर यांनी आपल्या पदासह पक्षाचा राजीनामा दिला. जिल्हा परिषदेच्या उमेदवारांची यादी जाहीर झाल्यानंतर अनेक पक्षांमध्ये नाराजी नाट्य रंगू लागले आहे. आज युवासेना तालुका सचिव केतन शिरोडकर यांनी शिवसेनेला (उबाठा) जय महाराष्ट्र करत पक्षाचा राजीनामा दिला.
यावेळी त्यांना याबाबत विचारले असता त्यांनी पक्षाने ऐनवेळी उमेदवारी नाकारल्यामुळे आपल्या पदासह पक्षाचा राजीनामा देत असल्याचे सांगितले. केतन शिरोडकर यांचा पिंगुळी मतदारसंघात मोठा जनसंपर्क असून ऐन निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे ठाकरे सेनेला फार मोठा धक्का मानला जात आहे.










