
कुडाळ : माणगाव विकास पॅनलच्या सरपंचपदाच्या उमेदवार कामिनी केशव भर्तू यांनी प्रचारात मोठी आघाडी घेतली आहे. डोअर टू डोअर प्रचारावर त्यांनी भर दिला असून गावच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध असून आपला विजय निश्चित आहे. घरपट्टी कमी करून माणगाव ग्रामपंचायत येथील घराणेशाही आणि ठेकेदारी पद्धत कायमस्वरूपी बंद करेन. मला फक्त कपाट या निशाणी समोर बटन दाबून विजयी करा, असे भावनिक आव्हान कामिनी केशव भर्तू यांनी केले आहे.
कामिनी भर्तू यांच्या उमेदवारीने या ग्रामपंचायत निवडणुकीत रंगत वाढली आहे. आज त्यांनी जोरदार प्रचार करत मतदाराना मतदान करण्याचे भावनिक आवाहन केले आहे. कामिनी केशव भर्तू यांनी पाचही प्रभाग पिंजून काढत जोरदार शक्तिप्रदर्शन केले आहे.