
देवगड : देवगड तालुक्यातील तिर्लोट नावनगर येथे संदेश पारकर यांनी भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत शादाब मंचेकर, रजाक भाटकर, रफिक भाटकर, कुदुस भाटकर, अरबाज भाटकर, अबूबकर सोलकर, कासिमिया भाटकर, रजाक वाडकर, फरीद काझी, कणकवली विधानसभा युवक अध्यक्ष राष्ट्रवादी शरद पवार देवेंद्र पीळणकर आणि नवानगर येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. येत्या निवडणुकीत संदेश पारकर यांच्या पाठीशी मुस्लिम समाज शंभर टक्के राहणार व या नवानगर भागातून शंभर टक्के मतदान संदेश पारकर यांना करणार असे येतील ग्रामस्थांनी यावेळी बोलताना सांगितले.