कणकवली शहरात महायुतीच्या प्रचाराला सुरुवात

Edited by: उमेश बुचडे
Published on: April 21, 2024 11:30 AM
views 420  views

कणकवली : भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचाराचा शुभारंभ आज कणकवली शहर येथील आराध्य दैवत श्री देव स्वयंभू मंदिरातून करण्यात आला. त्या प्रसंगी उपस्थित कणकवलीचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, अभिजित मुसळे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक, किशोर राणे, संजय कामतेकर, अण्णा कोदे, गौतम खुडकर, अभय राणे, महेश सावंत, औदुंबर राणे, मेघा गांगण, सुप्रिया नलावडे, राजेश्री धुमाळे आदी उपस्थित होते. यावेळी महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचा तसेच कणकवली शहरातून राणेंना लीड देण्याबाबतही निर्धार यावेळी करण्यात आला.