निलेश राणेंच्या प्रचारार्थ रॅली

Edited by:
Published on: November 10, 2024 13:29 PM
views 333  views

कुडाळ : कुडाळ शहरातील गांधी चौक ते पान बाजार पर्यंत महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांच्या प्रचारार्थ प्रचार फेरी काढण्यात आली. यापूर्वी श्रीदेवी पाटेश्वर व श्री गणेश यांच्या चरणी शिफळ अर्पण करून या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला.

कुडाळ शहरांमध्ये माहितीचे उमेदवार निलेश राणे यांच्या प्रचारार्थ प्रचार फेरीला सुरुवात करण्यात आली गांधी चौकापासून ही प्रचार फेरी सुरू झाली यामध्ये घोषणाबाजी करण्यात आली तसेच प्रत्येक नागरिकांना महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांची निशाणी आणि त्यांच्या कर्तृत्वाची माहिती व शासनाच्या योजना सांगण्यात आल्या या प्रचार फेरीमध्ये शिवसेनेचे तालुकाप्रमुख अरविंद करलकर, माजी नगराध्यक्ष विनायक राणे, बंटी तुळसकर, शहर प्रभारी राकेश कांदे, मुक्ती परब, संजय भोगटे, भाजपा प्रदेश सदस्य बंड्या सावंत, माजी उपनगराध्यक्ष आबा धडाम, भाजपा गटनेता विलास कुडाळकर, नगरसेविका प्राजक्ता बांदेकर, नयना मांजरेकर, चांदणी कांबळी, नगरसेवक अभी गावडे, राजीव कुडाळकर, सिद्धेश शिरसाट, सिद्धी शिरसाट, चेतन पडते, शहर अध्यक्ष शहर प्रमुख रोहित भोगटे, जनार्दन कुडाळकर निलेश शिरसाट प्रकाश कोरगांवकर आदी उपस्थित होते.