वजन काटे, इलेक्ट्रिक काट्यांच्या फेरपडताळणीसाठी 20 जुलैपासून शिबीर

Edited by: कृष्णा ढोलम
Published on: July 19, 2023 18:35 PM
views 125  views

मालवण : वजन काटे, इलेक्ट्रिक काटे व इतर यांचे फेरपडताळणी व मुद्रांकन करण्यासाठी सावंतवाडी विभागाचे निरीक्षक यांनी दोडामार्ग, भेडशी, बांदा  येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवारी 20 जुलै रोजी दोडामार्ग, 21 व 22 जुलै रोजी भेडशी, 23 ते 25 या कालावधीत बांदा येथे हे शिबीर होणार आहे. वजन काटे, इलेक्ट्रीक काटे, तेल मापे, रॉकेल मापे, रेशन दुकानदार, भाजी, काजू व इतर व्यापाऱ्यांनी सकाळी 9 वाजता शिबिराला उपस्थित राहावे.  तसेच मागच्या वेळी ज्यांनी मूद्रांकन केले नाही त्यांनी येताना आधारकार्ड घेऊन यावे असे आवाहन रामेश्वर रिपेरिंग वर्क्सचे विजय नेमळेकर यांनी केले आहे.