
दोडामार्ग : साटेली - भेडशी वरचा बाजार येथे एसटी स्टॉप जवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत एका वासराचा मृत्यू झाला आहे. सकाळी बराच वेळ झाला तरी रस्त्यावर पडलेले ते मृत वासरू तसेच रस्त्यावर असल्याचे छायाचित्रात आहे. या निमित्ताने मोकाट जनावरांची समस्या पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. मोकाट जनावरे रात्रीची रस्त्यावर थांबल्याने असे प्रकार घडत आहेत. शिवाय बाहेरगावची वाहने येथून रात्री जात असल्याने रात्रीच्या वेळी असे अपघात घडून मुक्या प्राण्यांच्या बळी जात आहेत. इतकचं नव्हे तर या अपघातानी वाहनचालक यांच्या जीवितास सुध्दा धोका आहे. अज्ञात वाहनाने धडक देऊन वासरू मृत झाले असले तरी त्याची विलेव्हाट लावण्यासाठी बराच वेळ कोणी पुढाकार न घेतल्याने या प्रकारांना जबाबदार कोण असाही प्रश्न उपस्थित होत आहे.