
कणकवली : उपजिल्हा रुग्णालयात हाडांच्या उपचारासाठी सीआर्म मशीन दाखल झाली आहे. गेले कित्येक महिने या मशीन अभावी हाडांच्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया होत नव्हत्या त्यामुळे त्या शस्त्रक्रिया मशीन उपलब्ध झाल्यामुळे होणार आहेत.
आमदार नितेश राणे यांनी डिसेंबर महिन्यात नागपूरच्या विधिमंडळ अधिवेशनात आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्यासोबत बैठक घेऊन कणकवली, देवगड, वैभववाडी येथील रुग्णालयात लागणारे मशीन व डॉक्टर आणि अन्य समस्या संदर्भात बैठकीत चर्चा केली होती. त्यामुळेच कणकवली उपजिल्हा रुग्णालयात हाडांच्या उपचारासाठी ही सी आर्म मशीन मंगळवारी दाखल झाली आहे. लवकरच ही मशीन कारवाई कार्यान्वित करून रुणांच्या सेवेसाठी आता उपलब्ध होणार असल्याचे समजत आहे. ही मशीन दाखल झाल्यामुळे रुग्णालयात हाडांच्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया होणार आहेत.