
सावंतवाडी : सावंतवाडी तालुका खरेदी-विक्री संघाच्या चेअरमन व व्हाईस चेअरमन पदांची निवड बुधवारी ३० नोव्हेंबर रोजी दुपारी १२.३० वाजता होणार आहे. भाजपा आणि बाळासाहेबांची शिवसेना यांच्या युतीच्या श्री देव पाटेकर सहकार परिवर्तन पॅनलनं दणदणीत विजय प्राप्त केला. भाजपा आणि बाळासाहेबांची शिवसेना युतीच्या १५ पैकी १५ उमेदवारांनी एकतर्फी विजय प्राप्त करत महाविकास आघाडीच्या पॅनेलचा सुपडा साफ केला होता. या युतीचे प्रमोद गावडे, प्रमोद सावंत, आनारोजीन लोबो, ज्ञानेश परब, प्रवीण देसाई, दत्ताराम कोळमेकर, विनायक राऊळ, आत्माराम गावडे, दत्ताराम हरमलकर, प्रभाकर राऊळ, रघुनाथ रेडकर, नारायण हिराप, भगवान जाधव, रश्मी निर्गुण, शशिकांत गावडे यांनी विजय प्राप्त केला असून खरेदी-विक्री संघाच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष पदासाठी प्रमोद गावडे, प्रमोद सावंत, अनारोजीन लोबो यांची नाव चर्चेत आहे.