पारपोलीत होतोय 'फुलपाखरू महोत्सव' !

शुक्रवारी उद्घाटन
Edited by: विनायक गावस
Published on: October 19, 2023 19:41 PM
views 106  views

सावंतवाडी : पारपोली येथे संयुक्त वन व्यवस्थापन समिती, पारपोली व महाराष्ट्र वनविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित फुलपाखरु महोत्सव २०२३ चा उद्घाटन सोहळा २० ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी ११.०० वा. आयोजित करण्यात आला आहे. २० ते २३ ऑक्टोबर २०२३ पर्यंत हा फुलपाखरु महोत्सव पारपोली येथे पार पडणार आहे.

यावेळी पालकमंत्री रविंद्र चव्हाण, खासदार विनायक राऊत, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थितीत राहणार असून जिल्हाधिकारी किशोर तावडे, मुख्य वनसंरक्षक आर एम रामानुजम, पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, मुख्याधिकारी प्रजित नायर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन उपवनसंरक्षक एस. नवकिशोर रेड्डी, सहाय्यक वनसंरक्षक डॉ. सुनिल लाड, वनक्षेत्रपाल आंबोली विद्या घोडके, पारपोली सरपंच कृष्णा नाईक यांनी केल आहे.