वेंगुर्ला आगारातून अष्टविनायक दर्शनसाठी बसेस रवाना

एकाच वेळी सोडल्या 4 विठाई बस
Edited by: दीपेश परब
Published on: October 26, 2022 15:18 PM
views 318  views

वेंगुर्ले : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, कोकण प्रदेश सिंधुदुर्ग विभाग वेंगुर्ला आगारामार्फत आज २६ ते २९ ऑक्टोबर असा ४ दिवस अष्टविनायक दर्शनसाठी खास एकाच वेळी ४ विठाई बसेस सोडण्यात आला. या यात्रेचे उद्घाटन वेंगुर्ला पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक शेखर दाभोलकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. या यात्रेला प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे.

    ही अष्टविनायक यात्रा प्रवासी वर्गातून मागणी होती ती पुर्ण करण्याचा आमचा प्रयत्न राहिल. तसेच अजूनही प्रवासी उपलब्ध झाले तर अजून बसेस सोडण्यात येतील. असी माहीती यावेळी वेंगुर्ला आगार व्यवस्थापक श्री शेवाळे यांनी दिली. यावेळी वाहतूक निरीक्षक निलेश वारंग, निरीक्षक एल डी पवार, मकरंद होळकर, पप्पु ताम्हाणेकर, राहुल आरोलकर, श्री येसाजी, गुरू गावडे, नंदू दाभोलकर, आशिष खोबरेकर, विठ्ठल जाधव यांच्यासाहित आगारातील क्लार्क, वाहतूक नियंत्रक, महिला कर्मचारी, चालक, वाहक आदी उपस्थित होते. या यात्रेमुळे प्रवासी वर्गाने समाधान व्यक्त केले.

  या यात्रेसाठी एकूण ४ विठाई बससह एन आर होळकर, जी आर गावडे, आर वाय आरोलकर, ए के येसाजी, एस आर ताम्हणेकर, वाय डी खानोलकर, वाय एस बोवलेकर, आर पी पालकर असे ८ चालक व नंदू दाभोलकर, गौरेश राणे, अंकुश केरकर, बाळू नाईक हे ४ आचारी रवाना झाले आहेत. तसेच प्रवाशांसाठी जेवणाच्या साहित्य व जेवणाची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती निरीक्षक निलेश वारंग यांनी दिली.