बस चालक मुळीक यांचं उपोषण मागे...!

Edited by:
Published on: January 27, 2024 10:19 AM
views 76  views

सावंतवाडी : सावंतवाडी बस स्थानक येथील बस चालक मुळीक यांचे विविध मागण्यामुळे होणाऱ्या अन्यायामुळे प्रजासत्ताक दिनी सकाळपासून उपोषण सुरू होते. दरम्यान मनसे आणि शिवसेना यांच्या मध्यस्थीमुळे बस डेपो मॅनेजर गावित यांनी त्यांच्या मागण्याची १५ दिवसात पुर्तता करू ही ग्वाही दिली. त्यानंतर हे उपोषण स्थगित करण्यात आले. सावंतवाडी बस स्थानकात प्रजासत्ताक दिना दिवशी चालक मुळीक यांनी आपल्या मागण्यांसाठी सकाळपासून बेमुदत उपोषण छेडले होते.

या उपोषणाची दखल सावंतवाडी डेपो मॅनेजर यांच्याकडून घेत नसल्याने मनसेचे उपजिल्हाध्यक्ष सुधीर राऊळ आणि शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी, तालुकाप्रमुख नारायण राणे, गजानन नाटेकर यांनी संध्याकाळी येऊन  मध्यस्थी केली. यानंतर डेपो मॅनेजर गावित यांनी १५ दिवसात मागण्या मान्य करण्यात येतील अस आश्वासन देऊन त्यांच उपोषण सोडण्यात आले.

यावेळी मनसे उपजिल्हाअध्यक्ष सुधीर राऊळ, मनविसे जिल्हाअध्यक्ष केतन सावंत, साहील तळकटकर तसेच शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी, तालुकाप्रमुख नारायण राणे, गजानन नाटेकर आदि उपस्थित होते.