उभी असलेली रिक्षा जळुन खाक

Edited by: प्रसाद पाताडे
Published on: October 10, 2023 19:11 PM
views 2398  views

कुडाळ : सोमवारी मध्यरात्री नेरूर वाघोसेवाडी येथे उभी करून ठेवलेली रिक्षा  जळुन खाक झाली असुन सदर रिक्षाला आग कशी लागली याचे नेमके कारण समजु शकले नाही. या प्रकरणी कुडाळ पोलिस अधिक तपास करीत आहेत. या प्रकरणी कुडाळ पोलिस ठाण्यात रिक्शा चालक गोविंद खवणेकर (रा. नेरूर वाघोसेवाडी) यांनी खबर दिली की, त्यांनी वालावल मेस्त्री वाडी येथील प्रभाकर मेस्त्री यांच्या मालकीची (एमएच 07 एफ 1621) क्रमांकाची रिक्शा ते गेली चार वर्षे चालवित होते. व ती रिक्शा रात्री नेरूर वाघोसेवाडी येथील शृंगारे यांच्या घरानजीक उभी करून ठेवत होते. 

दरदिवशी प्रमाणे सोमवारी रात्री ही त्यांनी रिक्षा शृंगारे यांच्या घरानजीक उभी करून ठेवली होती. रात्री 3 वाजण्याच्या सुमारास दिपक शृंगारे हे घरा बाहेर आले असता त्यांना रिक्शा जळताना दिसुन आली. त्यामुळे त्यांनी तात्काळ याची माहिती गोविंद खवणेकर यांना दिली. ते ही घटनास्थळी आले व ग्रामस्थांच्या सहाय्याने सदर रिक्शाला लागलेली आग आटोक्यात आणण्यात आली. मात्र तरीही रिक्षा  पुर्णपणे जळुन खाक झाली होती.

घटनास्थळी कुडाळ पोलिस ठाण्याचे पोलिस हेड काॅन्टेबल अनिल पाटील यांनी जात पंचनामा केला असुन ते या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत. सदरच्या या रिक्षाला आग कशी लागली याचे नेमके कारण मात्र समजु शकले नाही.