
सावंतवाडी : आंबोलीवासियांच्या जिव्हाळ्याचा असलेला कबुलयतदार जमीन प्रश्न गेली अनेक वर्ष रखडलेला होता तरी त्या संदर्भात काल झालेला कॅबिनेट बैठकीत संबंधित प्रस्ताव मंजूर करून राज्यातील शिंदे - फडणवीस सरकारने तो प्रश्न मार्गी लावला आहे या संदर्भात गेली कित्येक वर्ष दीपक केसरकर यांनी योग्य तो पाठपुरावा केला होता .या निर्णय मुळे आंबोली गावात आनंदी वातावरण आहे.
तरी या संदर्भात श्रेयवाद आणून युती सरकारच्या या निर्णयाला वादाचा मुद्दा करू नये . बंटी पुरोहित यांना कबुलायतदर प्रश्न पूर्ण माहीत नसेल तर त्यांनी आंबोली गावाच्या विषयात पडू नये. मी स्वतः एक गावकर व कबुलायतदर आहे त्यामुळे हा प्रश्न सोडवण्यासाठी कोणी प्रयत्न केले आहेत हे आम्हाला माहिती आहे त्यामुळे या गावच्या विकासाच्या चांगल्या निर्णय च आम्ही आंबोली शिवसेना तर्फे स्वागत करतो व युती सरकारचे आभार मानतो अशी माहिती शिवसेना आंबोली विभाग प्रमुख विलास गावडे यांनी दिली