
सावंतवाडी : भाजप युवा मोर्चाचे जिल्हा चिटणीस बंटी पुरोहित यांनी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना नेते, आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत त्यांचे पक्षात स्वागत करण्यात आले. जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत यांच्या हस्ते श्री. पुरोहित यांचे स्वागत करण्यात आले. जिल्हा संघटक, माजी नगराध्यक्ष संजू परब यांचे ते विश्वासू सहकारी आहेत. श्री. परब यांनी जाहीर केल्याप्रमाणे शिवसेनेत येणाऱ्या समर्थकांना पक्षात प्रवेश दिला जाईल. त्याप्रमाणे बंटी पुरोहित यांचा प्रवेश झाला आहे.
यावेळी आमदार निलेश राणे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, आनंद शिरवलकर, प्रेमानंद देसाई यांच्यासह शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बंटी पुरोहित यांचा शिवसेनेत प्रवेश झाला आहे.