
सावंतवाडी: मतदार आमच्या पाठीशी आहेत. आज ते दिसत आहे. त्यामुळे माजगावात विरोधकांचे मनसुबे धुळीला मिळणार असुन विजय हा आमचाच होणार आहे. प्रभाग क्रमांक ५ मध्ये कितीही प्रयत्न केले असले तरी अमिश उर्फ बंटी कासार यांच्यासह आमचे दोन्ही सदस्य बहुमताने निवडून येणार असा विश्वास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उप जिल्हा प्रमुख चंद्रकांत कासार यांनी केला आहे. यावेळी माजी सरपंच दिनेश सावंत यांसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.