
सावंतवाडी : मागाहून येणाऱ्या बुलेटची अल्टो कारला जोरदार धडक बसून अपघात झाला. या अपघातात दोन्ही वाहनाचे मोठे नुकसान झाले असून बुलेटस्वार युवक किरकोळ जखमी झाला आहे.
हा अपघात सायंकाळी साडेपाच वाजता शहरातील चिटणीसनाका हनुमान मंदिर शेजारी घडला. कोल्हापुर येथील पर्यटकानी आपली कार हनुमान मंदिर शेजारी पार्क केली होती. पार्क केलेली अल्टो रस्त्यावर आणत असताना मागून येणाऱ्या बुलेटस्वार चालक युवकाची कारला जोरदार धडक बसली. यात दोन्ही वाहनाचे नुकसान झाले. घटनास्थळी पोलिसांनी दाखल होत अपघाताची माहीती घेतली. दोघांनाही पोलिस ठाण्यात बोलावून घेतले. यानंतर उशिरा हे प्रकरण तडजोडीने मिटविण्यात आले.