
सावंतवाडी : सावंतवाडी बाजारपेठेमध्ये ठीकठिकाणी पडलेल्या खड्ड्यामुळे व्यावसायिक वाहन चालक व नागरिक अक्षरशः हैराण झाले होते. याची दखल घेऊन माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी सावंतवाडी बाजारपेठेतील रस्त्यावरील खड्ड्यांच्या विषयी नगरपरिषदेचा लक्ष वेधल होत. आक्रमक पवित्रा घेत खडेबोल सुनावले होते.
दोन महिने न टिकलेला रस्ता बघून माजी नगराध्यक्ष श्री.साळगावकर यांनी प्रशासनाला इशारा दिला. यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने खड्डे बुजवण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेऊन पूर्ण केले . त्यामुळे व्यावसायिक व वाहन चालक तसेच शहरातील नागरिकांनी साळगावकर यांचे आभार मानलेत. विविध प्रश्नांवर जाब विचारण्यासाठी बबन साळगावकर तब्बल चार वर्षांनी नगरपालिकेत गेले होते