सिंधुदुर्ग जि. प.च्या इतिहासात प्रथमच प्रशासकीय राजवटीत अर्थसंकल्प मंजूर

मूळ 17 कोटींच्या अर्थसंकल्पात वाढ करून 21 कोटी
Edited by: देवयानी वरसकर
Published on: January 02, 2024 16:47 PM
views 478  views

सिंधुदुर्गनगरी :  सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या सन 2023-24  च्या मूळ सतरा कोटीच्या अर्थसंकल्पात वाढ करून  अंतिम सुधारित अर्थसंकल्प  21 कोटी पर्यंत नेण्यात आला आहे. तर आगामी वर्षाचा  सन 2024-25 या वर्षासाठी  मूळ सतरा कोटीच्या अर्थसंकल्पास आजच्या विशेष सर्वसाधारण सभेत सिंधुदुर्ग जि.प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी मान्यता दिली. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या इतिहासात  प्रशासकीय राजवटीत   प्रथमच हा अर्थसंकल्प मंजूर झाला. यावर्षीच्या आगामी अर्थसंकल्पात प्रशासनाने विविध नाविन्यपूर्ण योजना हाती घेत कृषी आणि दुग्ध विकासाला संजीवनी देणाऱ्या योजना तसेच बेरोजगारांसाठी कौशल्य विकास व भजनी कलाकारांसाठी  योजनांचा समावेश करा  भरीव निधीची तरतूद केली. 

      मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप नायर यांनी या वर्षात  व पुढील वर्षात  कृषी पशुसंवर्धन बेरोजगारांसाठी दुग्धोत्पादनासाठी भजनी मंडळांसाठी  नाविन्यपूर्ण योजना आणल्या वा अर्थसंकल्पात याचा समावेश केल्याचे जाहीर केले. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा वित्त अधिकारी  बाळासाहेब पाटील यांनी या सभेचे प्रास्ताविक केले. व अर्थसंकल्पातील विविध तरतुदी जाहीर केल्या. यावेळी  प्रभारी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रकल्प संचालक उदय पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी  किशोर काळे, विशाल तनपुरे, जिल्हा परिषदेचे विविध खाते प्रमुख अधिकारी उपस्थित होते.संभाव्य निवडणुकांची आचारसंहिता लक्षात घेता हे अर्थसंकल्प तत्पूर्वी  मंजूर करण्यात आल्याचेही प्रजित नायर यांनी स्पष्ट केले  

      कृषी व पशुपक्षी प्रदर्शनासाठी यावर्षी असलेली मूळ 40 लाखाची तरतूद वाढवून ते पन्नास लाखापर्यंत करण्यात आली आहे. आगामी वर्षातही मूळ अर्थसंकल्पात ही तरतूद तेवढेच ठेवण्यात आली आहे. जिल्ह्यातील दुधाचे उत्पादन वाढावे म्हणून चारा निर्मितीची योजना हाती घेण्यात आली असून 25 लाखाची तरतूद वाढवून ती पन्नास लाखापर्यंत मंजुरी देण्यात आली आहे. आगामी वर्षातही ही योजना कायम असून याच्या जोडीला एक नवी योजना हाती घेण्यात आली आहे. जास्त दूध संकलन करणाऱ्या केंद्रांच्या ठिकाणी 75 टक्के अनुदानावर 14 ठिकाणी सायलेज  मशीन द्वारे  चारा खाद्य टिकवून ठेवून वैरण पुरवण्याची योजना हाती घेण्यात आली आहे. गोपाळ  योजना तसेच कृत्रिम रेतन यासाठीही तरतूद ठेवण्यात आली असून सिंधुदूर्ग जिल्हा बँक भगीरथ प्रतिष्ठान यांच्यामार्फत या योजना राबविल्या जात आहेत. या योजनांना यावर्षीच्या व आगामी वर्षातील अर्थसंकल्पात तरतुदी ठेवण्यात आल्या आहेत.

 आयसीडीएस प्रकल्पासाठी 24 लाख रुपयांची तरतूद असून कुपोषित बालकांसाठी अर्थसंकल्पात आवश्यक तरतूद ठेवण्यात आली आहे तर आरोग्यासाठी ही आवश्यक तरतूद असल्याची माहिती या सभेत प्रजित नायर यांनी दिली.

  • बेरोजगारांनाही प्राधान्य !

भगीरथ प्रतिष्ठान, कॉज टू कनेक्ट कसाल शिक्षण संस्था यांच्यामार्फत होत असलेल्या कौशल्य विकास केंद्राच्या ठिकाणी  आवश्यक मशनरी साठी साडेसात लाखाची तरतूद सिंधू नगरी येथील केंद्रासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे तर पुढील वर्षासाठी वेंगुर्ला येथील केंद्रासाठी हीच तरतूद उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या ठिकाणी सुतार गवंडी प्लंबर आधी कौशल्य विकास प्रशिक्षणे होणार असून बेरोजगारांना प्रोत्साहन देण्यासाठी ही योजनेला जिल्हा परिषदेने बळकटी दिली आहे.


  • आंगणेवाडी कुणकेश्वर साठी ही 20 लाख राखीव

जिल्ह्यात आंगणेवाडी व कुणकेश्वर ही मोठी यात्रा स्थळे असून या ठिकाणी येणाऱ्या भाविकांच्या सुविधेसाठी  यावर्षीच्या अर्थसंकल्पात  व पुढील वर्षाच्या अर्थसंकल्पात  20 लाखाची तरतूद राखीव ठेवण्यात आले आहे. भाविकांना सुविधा देणाऱ्या योजनांची देखभाल दुरुस्ती काही नवीन कामे यासाठी हा निधी वापरला जाणार आहे.

 

  • यावर्षी शाळा दुरुस्तीसाठी दोन कोटी वीस लाख

शाळा दुरुस्तींचा प्रश्न ऐरणीवर वर असल्यामुळे यावर्षीच्या अर्थसंकल्पात विशेष लक्ष देण्यात आले. जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच  शाळा दुरुस्तीसाठी यावर्षी.  दोन कोटी वीस लाख खर्च होणार आहेत


  • भजनी मंडळांना 32 लाख

भजनी मंडळांना भजनी संच देण्यासाठी  यावर्षीच्या मूळ अर्थसंकल्पात 10 लाखाची तरतूद होती ती वाढवून 32 लाखापर्यंत करण्यात आली. या योजनेला जिल्ह्यातील भजनी मंडळांनी मोठा प्रतिसाद दिला म्हणून ही तरतूद वाढविण्यात आल्याचे व या वर्षी 100 मंडळांना त्याचा लाभ दिल्याचे अजित नायर म्हणाले. आगामी वर्षात दहा लाखाची तरतूद ठेवण्यात आली असली तरी ती सुधारीत अर्थसंकल्प मंजूर करताना वाढली जाईल असेही ते म्हणाले.