
देवगड : देवगड तालुक्यातील तळवडे येथील बीएसएनल सेवेचा बोजवारा उडाला असून त्यामुळे नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. देवगड तळवडे येथील बीएसएनल सेवा सध्या कोलमडली असून येथील BSNL च्या नेटवर्क बाबत ग्रामस्थ सध्या नाराजी व्यक्त करत आहे.
सध्या ५ जी सीम कार्ड अथवा स्मार्ट फोनधारकच BSNL सेवेचा लाभ घेऊ शकत आहेत. या गावातील शेतकरी वर्ग तसेच बहुतांश नागरिक साधा फोन वापरत असल्यामुळे या गावात BSNL व्यतिरिक्त जनसंपर्कसाठी दुसरी कोणतीही साधना नसल्याने तळवडे तळेबाजार या ठिकाणी दूरसंचारच्या टॉवरमध्ये होणारी तांत्रिक अडचण BSNL सिम धारकांसाठी त्रासदायक व गैरसोयीचे ठरत आहे. तळवडे तळेबाजार येथील गेले काही दिवस टॉवरची तांत्रिक अडचण दुरुस्त करण्यास दूरसंचार विभागाला अपयश आलेले आहे. त्यामुळे ग्राहक वर्गातून संतप्त भावना व्यक्त होत आहेत. यामुळे ग्राहकांचे आर्थिक नुकसान होत आहे.
यामुळे दूरसंचारच्या या कारभाराबाबत ग्रामस्थांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत असून लवकरात लवकर BSNL सेवा सुरळीत करण्यात यावी अशी नागरिकांकडून मागणी केली जात आहे.