मोदी सरकारच्या योजना तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहचवा : निलेश राणे

Edited by: प्रसाद पाताडे
Published on: January 05, 2024 17:25 PM
views 79  views

कुडाळ : भारतीय जनता पार्टी कार्यालयातून सर्व सामान्य नागरिकांच्या समस्या सोडवा, पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या योजना तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहचवा अशा सूचना वेताळ बांबर्डे येथील भारतीय जनता पक्षाच्या नूतन पक्षीय कार्यालयाच्या उदघाटन प्रसंगी बोलता भाजप नेते माजी खासदार निलेश राणे यांनी केल्या.

भारतीय जनता पार्टी वेताळ बांबर्डे पक्षीय कार्यालयाचे उदघाटन भाजप नेते निलेश राणे यांच्या हस्ते शुक्रवारी पवनाई टेम्ब  येथे संपन्न झाला यावेळी, कुडाळ मंडळं अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, ओरोस मंडळ अध्यक्ष दादा साईल, दीपक नारकर, पप्या तवटे, रुपेश कानडे, आनंद शिरवलकर, संदेश नाईक, अवधूत सामंत, देवेन सामंत, याच्या सह महिला पदाधिकारी संध्या तेरसे, प्राजक्ता बांदेकर, दिपलक्ष्मी पडते, प्रणाली घाडी, सलोनी आंगणे, आदी गावातील पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी बोलताना निलेश राणे म्हणाले कि, हे कार्यालय सुरू केला असला तरी हे कार्यालय कसं चालवावं हे मला तुम्हाला सांगायची गरज लागणार नाही, कार्यालय उघडलंय हे टाइमपास साठी नसून सर्व सामान्य नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी आहे. जनसेवा डोक्यात ठेवून या कार्यालयातून काम झालं पाहिजे. या कार्यालयातून दर्जेदार काम होईल याची मला कोणताही शंका नाही मात्र या कार्यालयाच्या चाव्या कोणाकडे असतील याची नावे मला मिळायला हवी, कोणताही अनुचित प्रकार या कार्यालयात होणार नाही याची जबाबदारी तुमची असेल असेही निलेश राणे म्हणाले.

पुढे म्हणताना निलेश राणे म्हणाले की सत्तेमध्ये असताना  सर्वसामान्य नागरिकांच्या अपेक्षा सत्ताधाऱ्यांकडून सर्वाधिक असतात. पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी मी पाठवलेलं कोणतंही काम नाकारलेलं नाही, या उलट त्यांनी मी पाठवलेला प्रत्येक कामाला कसा न्याय देता येईल हे पाहिलं. त्यामुळे आपल्याला अनेक वर्षानंतर  असे काम करणारे चांगले पालकमंत्री लाभले आहेत. या आधी जिल्हा नियोजन मधून आपल्याला पैसा दिला जात नव्हता. तर याला आमदार वैभव नाईक यांनी पत्रकार परिषदेत दुजोरा देत खरंच याआधीही पैसा आला नाही असं म्हटलं आहे. त्यामुळे आमदारच मान्य करत आहेत की उद्धव ठाकरे सरकारच्या काळात पैसा खरच आला नाही. अशी टीका निलेश राणे यांनी यावेळी केली. तर कुडाळ मालवण मतदारसंघ मला महाराष्ट्रातील उत्तम मतदारसंघ बनवायचे आहे त्यासाठी माझे दिवस-रात्र प्रयत्न सुरू असल्याचे निलेश राणे यांनी भाषणादरम्यान सांगितले. तर कार्यकर्ता म्हणून अवधूत सामंत याच्याबद्दल माझ्या मनात वेगळ्या भावना आहेत तर त्याच्याही मनातील भावना मी समजू शकतो, असे निलेश राणे यांनी सांगत कार्यकर्ता म्हणून अवधूत सामंत यांचे कौतुक केले.

तर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे सिंधुदुर्ग जिल्ह्यावर अतोनात प्रेम आहे जर ते दिल्लीत असले तरी त्यांचे विशेष लक्ष जिल्हा वरती असते, तर जिल्ह्याला काय मिळायला हो यासाठी ते मागील 40 वर्षे प्रयत्नशील आहेत. केंद्रीय मंत्री नारायणाने कोणत्याही पदाच्या मागे गेले नाहीत तर त्यांना बोलवून पद देण्यात आली त्यामुळे काम अशी करा की नाव झालं पाहिजे  व नाव असं करा की काम झालं पाहिजे. असा संदेश आहे यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना दिला. तर यावेळी बोलताना दीपक नारकर यांनी पक्षातील अंतर्गत गटबाजी, रुसवे फुगवे, बाजूला ठेवत निलेश राणे यांच्या आमदारकीसाठी प्रयत्न करूयात असे सांगितले या सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रुपेश कानडे यांनी केले व आभारही त्यांनीच मानले.