
सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी फेडरेशन आणि श्रीदेवी माऊली शिक्षण प्रसारक मंडळ, सोनुर्ली यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय कबड्डी संघ निवड स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत संपूर्ण जिल्ह्यातून मुलांचे 13 आणि मुलींचे 10 संघ सहभागी झाले होते. या स्पर्धेत माऊली माध्यमिक विद्यालय, सोनुर्लीच्या संघाने देखील सहभाग घेतला होता. स्पर्धेमध्ये विद्यालयातील खेळाडूंनी उत्कृष्ट खेळ कौशल्याचे प्रदर्शन करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. विशेषतः सोनुर्ली विद्यालयाचा विद्यार्थी तेजस ज्ञानेश्वर परब याची अंतिम 15 खेळाडूंच्या संघात निवड झाली आहे.
ही निवड माऊली विद्यालयासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे.येत्या एक-दोन दिवसांत या निवडलेल्या खेळाडूंसाठी माऊली विद्यालयात विशेष प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात येणार आहे. त्यानंतर हा संघ नाशिक येथे होणाऱ्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत सहभागी होणार असून विद्यालयाचा तेजस परब या संघात जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे. तेजस परब याच्या या यशस्वी निवडीबद्दल श्रीदेवी माऊली शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष दिगंबर मोर्ये, उपाध्यक्ष आनंद नाईक, सचिव नरेश मोर्ये, सहसचिव नागेश गावकर, खजिनदार सौ. भारती गावकर, संचालक शंकर गावकर, भरत गावकर, आनंदी गावकर, लक्ष्मीदास ठाकूर, शरद धाऊस्कर, दीपक नाईक, मुकुंद परब, तेजस गावकर, आनंद धडाम, महेश राऊळ, भूषण ओठवणेकर, उदय गाड तसेच सल्लागार गोविंद मोर्ये, मुख्याध्यापक श्री.तेरसे, शिक्षकवृंद श्री. काकतकर, श्री.सावंत व शिक्षकेतर कर्मचारी श्री नाईक, श्री गावकर, श्री जाधव, श्री निर्गुण यांनी त्याचे अभिनंदन केले. माऊली विद्यालयासाठी ही बाब अत्यंत गौरवाची असून संपूर्ण पंचक्रोशीत त्याचे कौतुक केले जात आहे. तेजस परब याच्या पुढील वाटचालीसाठी संपूर्ण विद्यालय व श्रीदेवी माऊली शिक्षण प्रसारक मंडळ सोनुर्ली तर्फे शुभेच्छा दिल्या आहेत.