सिंधूरत्न टॅलेंट सर्चमध्ये साळशी नंबर १ च्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी

Edited by: नागेश दुखंडे
Published on: April 18, 2024 12:53 PM
views 83  views

देवगड : देवगड येथील जिल्हा परिषद केंद्रशाळा साळशी नं १ या प्रशालेतील ३ विद्यार्थ्यांनी भरीव कामगिरी करीत गोल्ड मेडल, २ विद्यार्थ्यांनी सिल्वर मेडल,तर ३ विद्यार्थ्यांनी ब्रॉंझ मेडल पटकावले आहे.या परीक्षेसाठी या  प्रशालेतून २१ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते,यापैकी इयत्ता दुसरी मधील पार्थ लब्दे १७० गुण मिळवून गोल्ड मेडलसह जिल्हा गुणवत्ता यादीत ४० वा आला, तर पूर्वा पारकर १६८ गुणासह गोल्ड मेडल, आदिनाथ गावकर १५० गुणासह सिल्वर मेडल, तर सांची साळसकर १३६ गुणासह सिल्वर मेडल प्राप्त केले. इयत्ता तिसरी मधील ईश्वरी गावकर १३० गुणासह  ब्रॉंझ मेडल तर आराध्य तेली ११२ गुणासह  ब्रॉंझ मेडल मिळवले. इयत्ता सहावी मधील  आर्या गावकर हिने १६४ गुण मिळवत जिल्हा गुणवत्ता यादीत ५ वी आली व तिची भारतीय अंतराळ संशोधन केंद्र  (इस्रो) येथे भेटीसाठी निवड झाली आहे. तसेच दर्शना केशव लब्दे हिला ११८ गुणासह ब्रॉंझ मेडल मिळाले. उर्वरीत सर्व विध्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले. या विद्यार्थ्यांना  केंद्रप्रमुख व प्रशालेचे मुख्याध्यापक गंगाधर कदम ,   पदवीधर शिक्षक संतोष मराठे, वर्गशिक्षिका हेमलता जाधव व  वर्गशिक्षिका स्मिता कोदले यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल सरपंच वैशाली सुतार मॅडम , उपसरपंच कैलास गावकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संतोष साळसकर, उपाध्यक्षा त्रिशा गावकर व सर्व सदस्य, सर्व शिक्षक ,पालक  व ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले आहे.