
कणकवली : कणकवली शहरात आज खासदार संजय राऊत यांचा पटवर्धन चौकमध्ये लावण्यात आलेला बॅनर नगरपंचायत प्रशासनाने पोलीस बंदोबस्तात हटवला.आज सायंकाळी पाच वाजता राऊत यांची याच ठिकाणी सभा होणार आहे. या सभेसाठी 'इलाका तेरा धमाका मेरा' असे बॅनर कणकवली पटवर्धन चौकामध्ये युवा शिवसेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी लावले होते.
हा बॅनर कणकवली नगरपंचायतने पोलीस बंदोबस्तात हटवला. हे बॅनर का हटवता, अशी विचारणा देखील नगरसेवक सुशांत नाईक यांनी केली. त्यावेळी कायदा आणि सुव्यवस्थेच्या भंग होऊ नये, यासाठी हा बॅनर हटवण्यात आल्याचे नगरपंचायत कर्मचारी विनोद सावंत यांनी सांगितले.