
दोडामार्ग : घोटगे गावात गेल्या डिसेबर महिन्यापासून लंपी रोगाचा प्रादुर्भाव सुरु होता. आता त्याचे प्रमाण अधिकच वाढत चालले आहे. या रोगाने दोन गायींचा मृत्यु झाल्याने शेतक-याचे पन्नास हजारांपेक्षा जास्त नुकसान झाले असुन नुकसानभरपाई जिल्हा विभागाकडून देण्यात यावी तसेच पशु जिल्हाचिकीत्सक विभागामार्फत अन्य बाधित जनावराना औषधोउपचार मोफत पुरविण्यात यावे, अशी मागणी घोटगे सरपंच भक्ती भरत दळवी यानी केली आहे.
लंपीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढत असताना पांडूरंग काशिराम दळवी यांची एक गाय तर रविंद्र मुकेश दळवी यांची एक गाय अशा दोन गायींचा मृत्यू झाला. अनेक गायी लंपीने बाधित आहेत.
याबाबत जिल्हा पशुचिकीत्सक यांच्याशी सरपंच यानी संपर्क साधून लंपीच्या रोगाचा प्रादुर्भाव ताबडतोब आटोक्यात आणावा. तसेच औषध उपचार मोफत करण्यात यावे. पुणे पशुचिकीत्सक हेल्पलाईन 1962 येथे संपर्क साधून म्रुत गाईची नोंद करुन येथील शेतकरीवर्गाच्या समस्या मांडल्या.
गायीना ताप येणे, वजन कमी होणे, डोळ्यातून पाणी येणे, शरीरावर गाठी येणे, दुध कमी देणे, भुक न लागणे अशी लक्षणे आढळल्यास तालुका पशु अधिकारी, किवा 1962 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन सरपंच भक्ती दळवी यानी केले आहे.
दोडामार्ग पशूवैद्यकिय अधिकारी डॉ. पटकारे यानी मृत गायीचा पंचनामा केला. हा पंचनामा तीन प्रतीत वरिष्ठ अधिकारी कार्यालयात सादर करणार असल्याची माहिती डॉ. पटकारे यानी दिली.
पांडूरंग दळवी यानी या गायीला वाचविण्यासाठी सुमारे 10 हजार रु.खर्च केले मात्र डॉक्टर गायीला वाचवू शकले नाही.