लाईफ लाईन फाऊंडेशनतर्फे 26 रोजी मेंदू विकार मोफत वैद्यकीय शिबिर

रत्नागिरी येथील चिरायू हॉस्पिटलचे प्रख्यात न्यूरोसर्जन डॉ. श्रीविजय फडके यांची उपस्थिती
Edited by: प्रतिनिधी
Published on: November 09, 2022 15:34 PM
views 193  views

देवगड : लाईफ लाईन फाऊंडेशन तर्फे दरवर्षी देवगड तालुक्यात अनेक लोकोपयोगी वैद्यकीय शिबिरे आयोजित केली जातात.आत्तापर्यंत लाईफ लाईन फाउंडेशन तर्फे 800 पेक्षा अधिक शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत.


या उपक्रमाचा एक भाग म्हणून शनिवार दिनांक 26 नोव्हेंबर रोजी सकाळी साडेनऊ ते साडेबारा या वेळात डॉ आठवले कॅम्पस येथे मेंदूच्या विकाराच्या रुग्णांसाठी एक मोफत वैद्यकीय शिबिर आयोजित केले आहे. 


अर्धशिशी , मेंदूत गाठी असणे, लकव्याचे रुग्ण, इतर मेंदूचे आजार, पूर्वी ज्यांची डोक्याची शस्त्रक्रिया झाली असेल रूग्ण. स्मृतीभ्रंश असणे, मणक्याचे आजार, मणक्याचे ऑपरेशन झालेले रुग्ण, गरगरणे चक्कर येणे हे लक्षणे असलेले रुग्ण यांची ह्या शिबिरात मोफत तपासणी होईल. कृपया येताना आपले पूर्वीचे सर्व रिपोर्ट घेऊन यावे. पूर्व नोंदणी झालेल्या रुग्णांची मोफत तपासणी करण्यात येईल. आवश्यक त्या रुग्णांची डोळ्यांची ही तपासणी मोफत करण्यात येणार आहे. या शिबिरासाठी रत्नागिरी येथील चिरायू हॉस्पिटलचे प्रख्यात न्यूरोसर्जन डॉ. श्रीविजय फडके हे आवर्जून उपस्थित राहणार आहेत.


नांव नोंदणीसाठी संपर्क

7382821000

7382822000