
कणकवली : ब्राह्मण युवा संघ कणकवलीतर्फे बुधवार १६ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वा. 'कृष्ण पूजन' हा दशावतार नाट्यप्रयोग आचरेकर प्रतिष्ठान,एसटी वर्कशॉप जवळ कणकवली येथे होणार आहे. दशावतार नाट्य रसिकांसाठी पुरूषोत्तम मासाचे औचित्य साधून हा प्रयोग सादर केला जाणार आहे.
या दशावतारी नाटकात आबा बर्वे, तेजस सोमण, नितीन फडके, मिलिंद जोशी, मयुर जोशी, गौरव सोमण, सिध्दार्थ काजरेकर, संजय काळे, दिनेश गोरे यांची भूमिका असणार आहे. हार्मोनियम मंदार जोशी, पखवाज समीर आपटे, झांज विराज धुपकर यांची संगीतसाथ असणार आहे. या प्रयोगाचा लाभ घ्यावा, असे आवाहन विघ्नेश गोखले, कांचन कांजरेकर, अतुल करंबेळकर, उत्तम बाक्रे यांनी केले आहे.










