
सावंतवाडी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मृद व जलसंधारण विभागाच्या लघु पाटबंधारे योजनेतंर्गत ऑनलाईन भुमिपूजन होणार आहे. परंतु , त्या आधीच माजगाव येथील धरणाचे भूमिपूजन भाजपचे नेते, माजी आमदार राजन तेली यांनी कुदळ मारत केले. दरम्यान, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी कार्यक्रमस्थळी उपस्थित राहत नारळ फोडत कोनशिलेच लोकार्पण केले.
तर थोड्याच वेळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ऑनलाईन भुमिपूजन सोहळा पार पडणार आहे. यावर गावच्या प्रथम नागरिक सरपंच डॉ अर्चना सावंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. गावच्या विकासात एक ऐतिहासिक गोष्ट आज घडत आहे. गावातील पाणी प्रश्न कायमचा मिटणार असून पाणी देण्याच पुण्य काम माजगाव देखील करणार आहे याचा अभिमान आहे. आजचा दिवस हा आमच्यासाठी सुवर्ण दिवस आहे. त्यामुळे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर व माजी आमदार राजन तेली या दोघांचही पेढा भरवून तोंड गोड केल्याची भावना सरपंच डॉ अर्चना सावंत यांनी व्यक्त केली.