अधिकाऱ्यास शिवीगाळ प्रकरणी दोघांना दंड

Edited by:
Published on: December 08, 2023 19:17 PM
views 334  views

सिंधुदुर्गनगरी : तत्कालीन तहसीलदार दोडामार्ग तथा निवडणुक नायब  तहसीलदार संजय दत्ताराम कर्पे  यांना १६ डिसेंबर  2018  रोजी  त्यांच्या शासकीय दालनामध्ये कुडासे गावातील उपोषणाबाबत इतर अधिकारी यांचेशी चर्चा करीत असताना आरोपी बाबुराव दत्ताराम धुरी, ( वय- 45) रा. भिकेकोनाळ, ता. दोडामार्ग, जि. सिंधुदुर्ग, सुभाष ऊर्फ बबलु सुरेश पांगम, (वय -40) रा. आयी, ता. दोडामार्ग, जि. सिंधुदुर्ग यांनी त्यांची कोणतीही परवानगी न घेता शासकीय दालनात प्रवेश केला व दोन्ही आरोपींनी नायब तहसीलदार कर्पे यांच्याशी वादविवाद, शिवीगाळी करुन तुम्हाला बघुन घेतो अशी धमकी देवुन शासकीय कामात अडथळा आणला होता.  त्याबाबत नायब तहसीलदार कर्पे यांनी दि. 18 डिसेंबर 2018 रोजी दिलेल्या तक्रारी वरुन दोडामार्ग पोलीस ठाणे गुरनं 123/2018 भा.द.वि.कलम 353,332,341,504, 506,34 या प्रमाणे गुन्हा दाखल होता.

या गुन्हयाचा तपास हा तत्कालीन तपासी अंमलदार सहा. पोलीस उपनिरीक्षक रघुनाथ देसाई यांनी करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केलेले होते. सदर केसची सुनावणी जिल्हा न्यायाधीश -2 व सहाय्यक सत्र न्यायाधीश सिंधुदुर्ग व्ही. एस. देशमुख यांच्या न्यायालयासमोर  झाली. त्यामध्ये आजरोजी वरील दोन्ही आरोपींना शासकीय अधिकाऱ्यास शिवीगाळी केल्याप्रकरणी भा.दं.वि कलम 504 अंतर्गत दोषी धरुन प्रत्येकी पाच हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावलेली आहे. या खटल्याचे न्यायालयातील कामकाज जिल्हा सरकारी अभियोक्ता अॅड. संदीप राणे यांनी पाहिलेले आहे.