
देवगड : माजी विद्यार्थी राजेंद्र थोरात यांच्याकडून शिरगाव हायस्कूल या प्रशालेच्या ग्रंथालयास १३२५० रुपये किमतीची ५३ पुस्तकांची देणगी स्वरूपात भेट दिली आहे. विद्यार्थ्यांना लहान वयातच वाचनाची आवड निर्माण व्हावी या हेतूने शिरगाव हायस्कूलचे माजी विद्यार्थी व पुणे येथे राहत असलेले राजेंद्र थोरात यांनी या प्रशालेतील ग्रंथालयास १३२५० रुपये किमतीची ५३ पुस्तकरुपी देणगी दिली आहे. तसेच या प्रशालेच्या मागासवर्गीय वसतिगृहाच्या दुरुस्तीसाठी ५० हजार रुपयांची देणगी देऊन या कामासाठी मोठा हातभार लावला आहे. राजेंद्र थोरात यांनी शाळेला दिलेल्या मोलाच्या देणगीबद्दल त्यांचे संस्थेच्या व शाळेच्यावतीने आभार मानले आहेत.
यावेळी माजी विद्यार्थी राजेंद्र थोरात, इंद्रायनी थोरात, संगीता वायंगणकर, सुधीर साटम, प्रसाद साटम, राजेंद्र साटम, या प्रशालेचे प्राचार्य शमशुद्दीन आत्तार, व्हि. डी. लब्दे,.आदिनाथ प्रसाद गर्ज आदी उपस्थित होते.