पदवीधर मतदार नोंदणी प्रारूप मतदार यादी

हरकती दाखल करण्यासाठी ९ डिसेंबर पर्यंत मुदत
Edited by:
Published on: November 28, 2023 19:49 PM
views 238  views

सिंधुदुर्ग : कोकण विभाग पदवीधर मतदार संघाच्या मतदार यादी अद्ययावत करण्याची प्रक्रिया सुरू असून यासाठी तब्बल १५१५४ पदवीधरांनी नोंदणी केली आहे. मागील निवडणुकीच्या तुलनेत यावेळी तिप्पट मतदारांनी नोंदणी केली आहे. तसेच या प्रारूप मतदार यादीवर दावे हरकती दाखल करण्यासाठी २३ नोव्हेंबर ते ९ डिसेंबर पर्यंत मुदत आहे. या कालावधीत जे पदवीधर मतदार होण्यापासून वंचित राहिले आहेत. असे पदवीधर यावेळी अर्ज करू शकणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

कोकण विभाग पदवीधर मतदार संघ प्रारूप मतदार यादी प्रसिध्दीबाबत जिल्हाधिकारी किशोर तावडे पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी निवडणूक उपजिल्हाधिकारी श्रीकांत गायकवाड आदी उपस्थित होते.