कृपासिंधु दूध सहकारी संस्थेकडून शेतकरी दूध उत्पादकांना बोनस

Edited by: विनायक गावस
Published on: November 28, 2023 19:39 PM
views 56  views

सावंतवाडी : न्हावेली येथील कृपासिंधु दूध सहकारी संस्थेच्यामार्फत शेतकरी दूध उत्पादकांना सन २०२२ - २३ च्या बोनसचे वाटप करण्यात आले. संस्था अध्यक्ष शरद धाऊसकर यांच्या हस्ते तब्बल ३५ दुध उत्पादकांना एकूण ६२ हजार ३४२ एवढा बोनस वाटप करण्यात आला. गतवर्षीपासून कृपासिंधु दूध सहकारी संस्थेची स्थापना करण्यात आली आहे.

पंचक्रोशीतील दूध उत्पादक शेतकऱ्यांना यामुळे फायदा झाला. न्हावेली गावासह सोनुर्ली, निरवडे, पाडलोस, पेंडूर गावातील दुध उत्पादक शेतकऱ्यांचे याठिकाणी दूध संकलन केले जाते. संस्थेने यावर्षीचा बोनस दूध उत्पादक शेतकऱ्यांना नुकताच पुरवठा केला. यावेळी दूध संस्थेचे अध्यक्ष शरद धाऊसकर, सचिव अर्जुन परब, सहसचिव वैभव धाऊसकर, संचालक लक्ष्मण परब, संतोष निर्गुण, लक्ष्मण धाऊसकर, प्रशांत कांबळी, रवी धाऊसकर, आनंद आरोंदेकर व दूध उत्पादक शेतकरी उपस्थित होते. वेळीच बोनस मिळाल्याने शेतकऱ्याकडून आनंद व्यक्त करण्यात आला.