
मालवण : मालवण वासियांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या धामापूर नळपाणी योजनेचे काम सध्या सुरु आहे. या कामाला भेट दिली असता काम बोगस पद्धतीने सुरु आहे असा आरोप करत या योजनेची अवस्था पण भुयारी गटार योजनेसारखी होणार अशी टीका ठाकरे शिवसेनेचे नगरसेवक तपस्वी मयेकर यांनी केला आहे.
नगरसेवक मयेकर यांनी म्हटले आहे, आज या कामाच्या ठिकाणी पाहणी केली असता, त्या ठिकाणी एकही अधिकारी, इंजिनिअर कामाच्या ठिकाणी नव्हता. कामगार आपणच स्वतः काम करत आहेत. कामाची योग्य लेव्हल नाही, योग्य खोदाई केली गेली नाही. गळती तपासणी करण्याआधी ही पाईप लाइन टाकत आहेत. आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्व नगरसेवकांनी या संदर्भात प्रशासनाला वेळोवेळी सूचना देऊनही त्यावर काही उपाययोजना होत नाही. गावठी पद्धतीने पाईप जोडण्याचे काम सुरु असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.











