
मालवण : सावंतवाडी येथून शहरात गादी विक्रीसाठी आलेल्या मुस्लिम विक्रेत्यांकडे असलेली आधारकार्ड बोगस असल्याचे तपासणीत आढळून आले. त्यामुळे आक्रमक बनलेल्या सकल हिंदू समाज बांधवांनी या विक्रेत्यांना प्रसाद देत पोलिसांच्या स्वाधीन केले.
रविवारी घडलेल्या घटनेनंतर सकल हिंदू समाज अधिकच आक्रमक बनला आहे. आज सकाळी सावंतवाडी येथून पिकअप गाडीतून आलेल्या मुस्लिम विक्रेत्यांना हिंदू समाज बांधवांनी हटकले. त्यांच्याकडे असलेल्या आधारकार्डची तपासणी केली असता दोघांची जन्मतारीख एकच असल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांच्याबद्दल संशय बळावला. सात गादी विक्रेते शहरात विविध ठिकाणी विक्रीसाठी उतरले होते. या सर्वांचा शोध घेत त्यांच्या आधारकार्डची तपासणी करण्यात आली. त्यांच्याकडे असलेली आधारकार्ड बोगस असल्याचे आढळून आले. त्यामुळे त्यांना चांगलाच प्रसाद देण्यात आला. या सर्व विक्रेत्यांना सकल हिंदू समाज बांधवांनी पोलिसांच्या ताब्यात देत कडक कारवाईची मागणी करण्यात आली.