
देवगड : देवगड तालुक्यातील खुडीपाट हसनवाडी जंगलात वहाळाच्या पाण्यात सडलेल्या स्थितीत मृतदेह आढळून आल्याची फिर्याद संजय धाकू जोइल यांनी देवगड पोलीस स्थानकात दिली आहे.त्यानुसार देवगड पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांन कडून मिळालेल्या माहिती च्या आधारे देवगड तालुक्यातील खुडीपाट येथील शोभा धाकू जोइल वय ८०या महिलेचा तो मृतदेह असून शोभा जोईल या गेले काही महिने मनोरुग्ण असून त्यांचेवर उपचार सुरू होते दि १७ जून रोजी त्या कोणालाही न सांगता घरातून निघून गेल्या होत्या.त्यांचा शोध घेण्यात आला अखेर त्यांचा मृतदेह वहाळाच्या पाण्यात सडलेल्या स्थितीत २८ जून रोजी आढळून आला.पोलीस उपनिरीक्षक सुधीर कदम या घटनेचा अधिक तपास करत आहेत.