
सावंतवाडी : कावळेसाद दरीत कोसळलेल्या कोल्हापूर येथील जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र बाळासाहेब सनगर (रा. चिले कॉलनी) यांचा मृतदेह बाहेर काढण्यास प्रशासनाला यश आले आहे. एनडीआरएफ टीम तसेच रेस्क्यू पथक सावंतवाडी पोलीस आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने ही मोहीम राबविण्यात आली. दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास शोधमोहीम थांबवण्यात आली. त्यांचा मृतदेह दरीत ३०० फुट खोलवर आढळून आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. मृतदेह सापडल्यावर पुढील सोपस्कारासाठी आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविण्यात आला.