
मालवण : मेढा येथील समुद्रात मासेमारी नौका पलटी होऊन समुद्रात पडून बेपत्ता झालेल्या जितेश वाघ या मच्छिमाराचा मृतदेह काही वेळापूर्वी दांडी श्रीकृष्ण मंदिर लगतच्या किनाऱ्यावर आढळून आला आहे. याबाबतची माहिती पोलिसांना देण्यात आली असून ते घटनास्थळी रवाना झाले आहेत.
मेढा समोरील समुद्रात मासेमारीसाठी गेलेली नौका वारा आणि लाटांच्या तडाख्यात पलटी झाली. यात तीन मच्छिमार समुद्रात पडले. दोघेजण वाचले तर जितेश वाघ हा बेपत्ता झाला होता. काल दिवसभर त्याचा शोध घेण्यात आला. मात्र तो सापडून आला नाही. आज दुपारी १२ वाजण्याच्या दरम्यान दांडी किनारी त्याचा मृतदेह स्थानिक मच्छिमारांना आढळून आला.