कुणकेश्वर समुद्रात पुरुषाचा मृतदेह आढळल्यान एकच खळबळ

Edited by: नागेश दुखंडे
Published on: September 23, 2023 18:34 PM
views 111  views

देवगड : कुणकेश्वर खडकाळ भागांमध्ये एक पुरुष जातीचे शव सापडून आले आहे. मालवण येथून बेपत्ता झालेल्या व्यक्तीचे हे शव असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. खडकात अडकलेली बॉडी ग्रामस्थांच्या मदतीने पोलिसांनी बाहेर काढलीे. याबाबत सर्व माहिती पोलीस स्टेशन प्रभारी यांनी देताच मालवण पोलीस स्टेशनकडील नापत्ता रजिस्टर नंबर 13/2023 मधील नापत्ता याचे भाऊ व नातेवाईक हे समक्ष कुणकेश्वर येथे येऊन त्यांनी मिळून आलेल्या शवाचे निरीक्षण व पाहाणी केली असता हे शव हे त्यांचा भाऊ नमा केपा मुंडा (मुळ रा.सुंदरगड ओरीसा) सध्या राहणार मालवण याचेच असल्याचे ओळखून सांगितलेले आहे. त्याप्रमाणे संबंधितांचे डीएनए नमुने प्राप्त करून घेऊन पुढील तपास करण्यात येत आहे.