मोती तलावात सापडला मृतदेह | ओळख पटली

Edited by: विनायक गावस
Published on: September 30, 2023 11:41 AM
views 353  views

सावंतवाडी : मोती तलावात काल रात्री अनोळखी व्यक्ती पडल्याची घटना घडली होती. यावेळी नगरपालिका प्रशासन व पोलिसांनी त्याचा शोध घेतला होता. मात्र ती व्यक्ती न सापडल्याने रात्री उशिरा शोध मोहीम थांबवण्यात आली होती.

दरम्यान, आज सकाळी काही नागरिकांना एक मृतदेह मोती तलावात तरंगताना आढळून आला असता माजी नगरसेवक राजू मसूरकर यांनी पोलिसांना व नगरपालिका प्रशासनाला याबाबत माहिती दिली. त्यानंतर तात्काळ यंत्रणा पाचारण करत सदरचा मृत्यूदेह बाहेर काढण्यात आला. मृत व्यक्तीची ओळख पटली असून मधुकर विठ्ठल गावडे असं त्यांचे नाव आहे. त्यांच्या पश्चात पत्नी व मुले आहेत. आज सकाळी त्यांचा मृतदेह तलावात आढळून आला.