कणकवली शहरात आढळला मृतदेह

Edited by:
Published on: March 15, 2025 11:27 AM
views 431  views

कणकवली : शहरात महापुरुष कॉम्प्लेक्सच्या मागील एका चिंचोळ्या भागामध्ये एका तरुणाचा मृतदेह आढळून आला. काळा टी - शर्ट व पॅन्ट व चेहऱ्यावर दाढी असलेल्या या तरुणाचा जवळपास तीन दिवसांपूर्वी मृत्यू झाला असावा अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली. दरम्यान, घटनेची माहिती मिळतात कणकवली पोलीस मारुती जगताप यांच्यासह पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मात्र, सदर तरुणाची ओळख पटली नसून या तरुणाची आत्महत्या घातपात की कसे याची उलट सुलट चर्चा आता सुरु झाली आहे. मात्र, पोलिसांनी प्राथमिक अंदाजानुसार हा घातपात नसावा अशी माहिती दिली आहे. पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक शरद देठे महेश शेडगे, दाजी सावंत, पांडुरंग पांढरे, भूषण सुतार आदि घटनास्थळी दाखल झाले आहे.