
मंडणगड : भिंगळोली येथील एका निवासी संकुलातील बंद असलेल्या फ्लँटमध्ये गुरुवार 20 मार्च 2025 रोजी दुपारी तीन नंतर अज्ञात व्यक्तिचा मृतदेह आढळून आला. या विषयासंदर्भात पोलीस स्थानकात नागरिकांनी सुचीत केल्यानंतर पोलीस लगेचच घटनास्थळी दाखल झाले व घटनास्थळी पंचनामा व अन्य प्रक्रीया सुरु केल्या.
अज्ञात मयत इसमाचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी भिंगळोली येथील ग्रामिण रुग्णालयात पोहच करण्यात आला. बंद फ्लँटमध्ये पोलीसांना मयत इसमाचे मृतदेहासह एक बँग सापडली आहे. मयत इसमाची ओळख पटून आलेली नाही. या संदर्भात पोलीस निरिक्षक नितीन गवारे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरु केला आहे.