
सावंतवाडी : महाराष्ट्रात आयोजित करण्यात येणाऱ्या जिल्हा साहित्य संमेलनासाठी संस्था नोंदणी अधिनियम, १८६० आणि सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम १९५० अंतर्गत नोंदणीकृत असणाऱ्या साहित्य संस्थांना सन २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी सहायक अनुदान देण्यासाठी पात्र संस्थांकडून १५ जून २०२५ ते १५ जुलै २०२५ या कालावधीत अर्ज मागविण्यात येत आहेत.
विहित नमुन्यातील अर्ज व नियमावली शासनाच्या https://www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर 'नवीन संदेश' या सदरात 'जिल्हा साहित्य संमेलनासाठी अनुदान' या शीर्षाखाली 'what's new' या सदरात 'Grant in Aid for Jilha Sahitya Sammelan' या शीर्षाखाली, तसेच महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या https://www.sahitya.marathi.gov.in या संकेतस्थळावर 'नवीनतम संदेश' या सदरात 'जिल्हा साहित्य संमेलनासाठी अनुदान' या शीर्षाखाली उपलब्ध होतील, तसेच हे अर्ज महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, रवींद्र नाट्यमंदिर इमारत, दुसरा मजला, पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी आवार, सयानी मार्ग, प्रभादेवी, मुंबई ४०० ०२५ (०२२ २४३२५९३१) येथे वरील कालावधीत कार्यालयीन वेळेत उपलब्ध असतील. या अनुदानासाठीचे अर्ज विहित नमुन्यात व विहित कालावधीत (दि. १५ जून, २०२५ ते १५ जुलै, २०२५) महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडे सादर करणे बंधनकारक राहील. विहित कालमर्यादेनंतर (दिनांक १५ जून, २०२५ ते १५ जुलै, २०२५) येणाऱ्या अर्जाचा अनुदानासाठी विचार केला जाणार नाही अशी माहिती महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई सचिव यांनी दिली आहे.