रक्तदाते आले धावून..!

Edited by: विनायक गावस
Published on: March 15, 2024 13:55 PM
views 246  views

सावंतवाडी : गोवा बांबोळी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल असलेल्या सुहासिनी माणगावकर या महिलेला बायपास सर्जरी दरम्यान A+ पॉझिटिव्ह या रक्तगटाच्या रक्तदात्यांची तातडीने आवश्यकता होती. यावेळी युवा रक्तदाता संघटनेचे सावंतवाडी येथील विनेश तावडे तर ईन्सुली येथील सुजय कोठावळे व यशवंत गांवकर यांनी गोवा मेडीकल कॉलेजच्या रक्तपेढीमध्ये जाऊन रक्तदान केले. यामुळे तातडीनं उपचार करण्यासाठी मदत झाली. या तातडीच्या रक्तदानासाठी युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सूर्याजी यांनी विशेष प्रयत्न केले. त्याबद्दल रक्तदात्यांचे नातेवाईकांनी आभार मानले.