शिक्षक समितीच्या शिबीरात २२ जणांचे रक्तदान !

Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: July 20, 2024 15:56 PM
views 211  views

सिंधुदुर्गनगरी : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती च्या 62 व्या वर्धापन दिनानिमित्त शिक्षक समिती तालुका शाखा सावंतवाडी यांच्यावतीने 20 जुलै 2024ला सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय रक्तपेढी या ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.  या सामाजिक दायित्वाच्या कार्यक्रमाचे उद्घाटन डॉक्टर ऐवळे, डॉक्टर वजराटकर, शिक्षक समितीचे माजी जिल्हाध्यक्ष  भाई चव्हाण, सिंधुदुर्ग जिल्हा पतपेढी अध्यक्ष नारायण नाईक, तुषार आरोसकर जिल्हा सरचिटणीस ,शिक्षक समिती सावंतवाडी अध्यक्ष  समीर जाधव, सरचिटणीस हेमंत सावंत व शिक्षक समिती पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.

22 तारखेला होणाऱ्या या वर्धापन दिनानिमित्त शिक्षक समितीच्या 22 शिलेदारांनी रक्तदान केले. यामध्ये अमोल कोळी, तुषार आरोसकर, भारत बांदेकर, समीर जाधव, हेमंत सावंत, नारायण नाईक, विश्राम ठाकर, ओमनाथ क्षीरसागर, अपय्या हिरेमठ, आशिष तांदुळे, दिलीप चव्हाण, सुजीत पवार, प्रशांत मडगावकर, अमोल सासवडे, परेश नाईक, पांडुरंग होंडे, अमित पिळणकर, प्रकाश शिंदे, किरण सावर, पंकज बिद्रे, सतीश राऊळ, प्रवीण शेर्लेकर यांनी रक्तदान केले.

      आजच्या मानवतेच्या या कार्यक्रमावेळी माजी जिल्हाध्यक्ष आद. भाई चव्हाण, माजी तालुकाध्यक्ष कल्याण कदम आवर्जून उपस्थित राहिले, मनीषा गावडे, अतुल कोळी, जे डी पाटील, उदेश नाईक, केशव जाधव, सुधीर गावडे, विदयाधर पाटील, प्रवीण कुडतरकर, राहुल वाघधरे, विष्णू चौधरी, मुरलीधर उमरे, दिपक जाधव हे शिक्षक समिती शिलेदार रक्तदान उपक्रम यशस्वी करण्यासाठी उपस्थित होते. यावेळी उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी प्रशासनाने सर्वतोपरी सहकार्य केले. सर्व रक्तदात्याचे शिक्षक समिती परिवाराकडून मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.