एकाचवेळी १० युवा रक्तदात्यांच रक्तदान

युवा रक्तदाता संघटना ठरतेय जनसामान्यांची 'ब्लड बँक' !
Edited by: विनायक गावस
Published on: June 01, 2023 13:51 PM
views 150  views

सावंतवाडी : युवा रक्तदाता संघटनेच्या माध्यमातून सावंतवाडीसह गोवा-बांबुळी येथील रूग्णांना रक्तदान करत जीवनदान देण्यात आले. तब्बल १० रक्तदात्यांनी युवा रक्तदाता संघटनेच्या आवाहनाला प्रतिसाद देत पुढाकार घेतला. यासाठी दात्यांचे युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी व रूग्णांच्या नातेवाईकांकडून आभार मानण्यात आले आहेत. 


यामध्ये गोवा बांबोळी रूग्णालयामध्ये ॲडमिट असलेल्या दादा वर्दम या रूग्णाला ऑपरेशन दरम्यान O+ पॉझिटिव्ह या रक्तगटाच्या रक्ताची तातडीने आवश्यक्यता होती. तेव्हा सावंतवाडी येथून अमिर खान, अक्षय मठकर यांनी गोवा बांबोळी रक्तपेढी मध्ये जाऊन रक्तदान केले. 


सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात ॲडमिट असलेल्या एका रुग्णाला  B+ पाॅझिटिव्ह या रक्तगटाच्या रक्ताची तातडीने आवश्यक्यता होती. तेव्हा अखिलेश कानसे, वर्धन पोकळे,सुरज सावंत, तुषार विचारे,मिनिनो रॉड्रिग्ज यांनी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय रक्तपेढी मध्ये जाऊन रक्तदान केले. 


सावंतवाडी येथील यशराज रुग्णालयात ॲडमिट असलेल्या डिमेलो या रुग्णाला  ऑपरेशन दरम्यान  O+ पाॅझिटिव्ह या रक्तगटाच्या रक्ताची तातडीने आवश्यक्यता होती. तेव्हा रोहित राऊळ यांनी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय रक्तपेढी मध्ये जाऊन रक्तदान केले. 


सावंतवाडी येथील भक्ती रूग्णालय मध्ये ॲडमिट असलेल्या सावित्री कोळेकर या रूग्णाला ऑपरेशन दरम्यान O- निगेटिव्ह या दुर्मिळ रक्तगटाच्या रक्ताची तातडीने आवश्यक्यता होती. तेव्हा जलाल‌ खान, राहुल पई यांनी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय रक्तपेढी मध्ये जाऊन रक्तदान केले. 


एकाच दिवशी युवा रक्तदाता संघटनेच्या माध्यमातून तब्बल १० रक्तदात्यांनी रक्तादान करत रूग्णांना जीवनदान दिले. यासाठी त्यांचे आभार मानण्यात आले. युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी यांनी यासाठी विशेष मेहनत घेतली.